Tuesday, March 19, 2024
Homeताज्या घडामोडीIndian Olympic Association : पी.टी. उषा आयओएच्या अध्यक्षपदी

Indian Olympic Association : पी.टी. उषा आयओएच्या अध्यक्षपदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध धावपटू आणि खासदार पी.टी. उषा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (Indian Olympic Association) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत केवळ पी.टी. उषा यांनीच एकमेव अर्ज दाखल केला होता.

पीटी उषा यांनी शनिवारी आयओए म्हणजेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली होती.

केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि माजी क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी पी.टी. उषा यांचे ट्विटरवर अभिनंदन केले. ते म्हणाले की, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष झाल्याबद्दल भारताच्या सुवर्ण मुलीचे अभिनंदन. इतर पदाधिकाऱ्यांचेही अभिनंदन. देशाला तुमचा अभिमान आहे.

पीटी उषाच्या नावावर आशियाई खेळांमध्ये एकूण ११ पदके आहेत आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये २३ पदके आहेत. त्यापैकी १८ सुवर्ण पदके आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -