Thursday, March 28, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023India vs New zealand: न्यूझीलंडविरुद्ध सामन्याआधी संकटात टीम इंडिया!

India vs New zealand: न्यूझीलंडविरुद्ध सामन्याआधी संकटात टीम इंडिया!

धरमशाला: एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये भारतीय संघ आपला पाचवा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे. हा सामना धरमशालामध्ये खेळवला जात आहे. दुपारी दोन वाजता हा सामना सुरू होईल. या विश्वचषकात आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी एकही सामना गमावलेला नाही. दोन्ही संघ विजयीपथावर आहेत. त्यामुळे आता हे पाहावे लागेल की कोणत्या संघाचा आज विजयरथ रोखला जाणार. जो संघ हा सामना जिंकणार तो संघ पॉईट्सटेबलमध्ये १० पॉईंट्ससह टॉपवर पोहोचेल आणि सेमीफायनलच्या जवळ पोहोचणार.

मात्र या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी मोठ्या अडचणी समोर आल्या आहेत. गेल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दुखापग्रस्त झाला होता तो हा सामना खेळणार नाही. पांड्याच्या जागी प्लेईंग ११मध्ये स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव अथवा इशान किशन यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

सूर्या आणि इशानने वाढवल्या भारताच्या अडचणी

यातच खबर आली आहे की सरावादरम्यान स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवही दुखापतग्रस्त झाला आहे. तर इशानला मधमाशीने डंख मारला आहे. या दोन्ही बातम्यांनी भारतीय संघाला डबल झटका दिला आहे. जर सूर्या आणि इशान आजच्या सामन्यासाठी फिट नसतील तर रोहितची डोकेदुखी नक्कीच वाढेल. कारण १५ सदस्यीय टीममध्ये कोणताही फलंदाज नाही जो पांड्याच्या जागेवर खेळू शकेल.

भारत-न्यूझीलंड वनडेत हेड टू हेड

एकूण सामने ११६
भारताने जिंकलेत – ५८
न्यूझीलंडने जिंकलेत – ५०
अनिर्णीत – ७
बरोबरी- १

विश्वचषकात भारत-न्यूझीलंड हेड टू हेड

एकूण वनडे सामने – ८
भारताने जिंकलेले – ३
न्यूझीलंडने जिंकलेले – ५

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -