Wednesday, April 24, 2024
Homeमहत्वाची बातमीआयर्लंड विरुद्धच्या सामन्यांसाठी भारताकडून राहुल त्रिपाठी

आयर्लंड विरुद्धच्या सामन्यांसाठी भारताकडून राहुल त्रिपाठी

मुंबई (हिं.स.) : भारतीय संघाला आयर्लंडमध्ये यजमान संघाविरुद्ध महिना अखेरीस दोन सामन्यांची टी २० मालिका खेळायची आहे. या सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतीच भारतीय संघातील शिलेदारांची नावे जाहीर केली. यावेळी संजू, सूर्यकुमार या दिग्गजांच्या संघात पुनरागमनासह आयपीएल २०२२ मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या पुणेकर राहुल त्रिपाठीची निवड झाली आहे. संघात पहिल्यांदाच निवड झाल्यामुळे तो खूप आनंदी आहे आणि स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

माझ्या कष्टाचे फळ!

संघात निवड झाल्यानंतर राहुलने माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझ्यासाठी ही एक खूप मोठी संधी आहे. माझं स्वप्न पूर्ण झाले आहे. निवड समितीने माझ्यावर विश्वास दाखवल्याचा मला आनंद आहे. हे माझ्या कष्टाचे फळ आहे. मला खेळण्याची संधी मिळाली, तर मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.

राहुलची कारकीर्द

आयपीएलच्या इतिहासात ३१ वर्षीय राहुल त्रिपाठी अनकॅप्ड खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १,७९८ धावा केल्या आहेत. त्याच्या मागे मनन वोहरा १,०७३ धावा करत दुसऱ्या, तर मनविंदर बिस्ला ७९८ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

राहुलने यंदाच्या १५ व्या आयपीएल हंगामात १४ सामन्यांत ३७.५५ च्या सरासरीने आणि १५८.२४ च्या स्ट्राईक रेटने ४१३ धावा केल्या होत्या. त्याने काही सामने संघाला एकट्याच्या जीवावार जिंकून दिले होते. दरम्यान आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करूनही त्याला संघात संधी मिळाली नव्हती. ज्यानंतर त्याच्या चाहत्यांसह काही माजी क्रिकेटपटूंनी टीका केली होती. पण आता राहुलला संघात स्थान मिळाले आहे.

आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक

भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यांचे वेळापत्रक – आयर्लंड दौऱ्यात भारतीय संघ दोन टी २० सामने खेळणार असून ते सामने २६ आणि २८ जून रोजी आयर्लंडमधील डबलिन क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -