Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाभारत दबाव चांगल्या प्रकारे हाताळतो...

भारत दबाव चांगल्या प्रकारे हाताळतो…

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबद्दल वीरेंद्र सेहवागचे वक्तव्य

दुबई (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषकातील सर्वात हाय-प्रोफाईल मॅच २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीवर या दोन्ही देशांतील नव्हे तर, संपूर्ण जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल. वर्ल्डकपच्या काळात पाकिस्तानकडून संघांची स्तुती करणारी मोठमोठी विधाने समोर येत असतात. तर, दुसरीकडे भारतीय संघ फक्त आपल्या रणनितीकडे लक्ष्य केंद्रीत करतो आणि दबाव चांगल्या प्रकारे हाताळतो. त्यामुळे निकाल काय येणार आहे हे माहिती असते, असे भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांनी म्हटले आहे.

टी -२० विश्वचषकातील सर्वात मोठ्या सामन्यासाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सुमारे २८ महिन्यांनंतर दोन्ही संघ समोरासमोर असतील. दोन्ही संघ शेवटच्या वेळी २०१९च्या विश्वचषकात मैदानात उतरले होते. आता सुपर -१२मधील उभय संघाचा रविवारी पहिला सामना असेल. भारत आणि पाकिस्तानला गट दोनमध्ये ठेवण्यात आले आहे, ज्यात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचाही समावेश आहे.

पाकिस्तानने विश्वचषकात भारताविरुद्ध एकही सामना जिंकला नाही आणि यावेळी तो जिंकू शकतो की नाही, याविषयी चर्चाही कायम आहे. मी नेहमी म्हणालो आहे, हा खूप मोठा खेळ आहे. आपण सद्यस्थिती आणि या फॉर्मेटबद्दल बोललो तर मला वाटते की, पाकिस्तानला नेहमीच अधिक संधी असते. कारण ते ५० षटकांच्या दीर्घ फॉर्मेटमध्ये चांगले खेळू शकत नाहीत. या फॉरमॅटमध्ये एकच खेळाडू कोणत्याही संघाला हरवू शकतो. पण तरीही, पाकिस्तान ते करू शकला नाही, २४ तारखेला काय होईल ते आपण पाहच, असे सेहवागने म्हटले आहे.

२००३ विश्वचषक आणि २०११ विश्वचषक याबद्दल बोलायचे झाल्यास आमच्यावर कमी दबाव होता. आमची स्थिती पाकिस्तानपेक्षा चांगली होती. आम्ही कधीच मोठमोठे दावे केले नाहीत. भारतीय संघ फक्त आपल्या रणनितीकडे लक्ष्य केंद्रीत करतो. त्यामुळे निकाल काय येणार आहे हे माहिती असते, असे सेहवाने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -