Saturday, April 20, 2024
Homeमहत्वाची बातमीरस्त्याच्या दुरवस्थेविरोधात बेमुदत उपोषण सुरू

रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात बेमुदत उपोषण सुरू

देवरूख  :संगमेश्वर तालुक्यातील कडवई ते तुरळ रस्त्याचे निकृष्ट काम तसेच कडवई तुरळ रस्त्याची दुरवस्था या विरोधात रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली यांच्या वतीने तुरळ येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला सर्वच स्तरातून वाढता पाठिंबा व्यक्त होत आहे.

कोरोनाचे नियम लक्षात घेऊन रिक्षा संघटनेच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण, सहखजिनदार राजेंद्र गिज्ये, मोहन कुंभार, महेंद्र चोपडे, सुभाष बोबले हे पाच पदाधिकारी उपोषणास बसले असून बाकी सर्व सदस्यांनी आपल्या रिक्षा बेमुदत बंद ठेवून या आंदोलनात सहभाग घेतला आहे. या आंदोलनाला राजकीय पक्षाकडून जाहीर पाठिंबा व्यक्त होत आहे.

मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, तुरळ सरपंच राधिका गिज्ये, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, कडवईचे माजी सरपंच वसंत उजगावकर, राजीवली उपसरपंच संतोष येडगे, नवनिर्मिती फाऊंडेशनचे अध्यक्ष रमजान गोलंदाज, चिखली ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम, राजवाडी उपसरपंच दिलीप गुरव, मनसे उपतालुकाध्यक्ष महेश गुरव, नंदकुमार फडकले, उदय घाग, राष्ट्रवादी उप तालुका अध्यक्ष फैयाझ माखजनकर, रामचंद्र किंजळकर, विजय साळवी, रमेश डीके यांनी उपस्थिती दर्शवून जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -