Friday, March 29, 2024
HomeदेशIFFI : भारत ही चित्रपट उद्योगाची मोठी बाजारपेठ - अनुराग ठाकूर

IFFI : भारत ही चित्रपट उद्योगाची मोठी बाजारपेठ – अनुराग ठाकूर

गोवा येथे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते ‘इफ्फी’चे शानदार उद्घाटन

गोवा (वृत्तसंस्था) : दक्षिण आशियातील सर्वात मोठी चित्रपट बाजारपेठ ‘भारत हा जगातील सर्वात मोठ्या चित्रपट निर्मात्या देशांपैकी एक आहे आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) हा आशियातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे. त्यामुळे चित्रपट निर्माते या महोत्सवात सहभागी होऊन भारतीय चित्रपट निर्मात्यांशी सहकार्य करार करतात. यासाठी इफ्फी हा अतिशय योग्य मंच असून भारत ही चित्रपट उद्योगाची एक मोठी बाजारपेठ बनली आहे.’ असे मत केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी व्यक्त केले.

गोवा येथे फिल्म बझारचे केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी फिल्म बझारच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर बोलत होते.

अनुराग ठाकूर पुढे म्हणाले, ‘इफ्फीमध्ये चित्रपटांसाठी सहनिर्माते आणि सहकारी शोधण्याच्या विपुल संधी आहेत. चित्रपट निर्मिती आणि विक्रीची मोठी बाजारपेठ बनण्याचे आमचे ध्येय आहे.’ यावेळी त्यांनी यंदाच्या इफ्फीमध्ये बदल घडविण्यासाठी आणि नवीन उप्रकम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि सुकाणू समितीच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. इफ्फी अधिक भव्य आणि उत्तम करण्यासाठी सूचना आणि कल्पना देण्याचे त्यांनी आवाहन केले.

५३ व्या इफ्फीदरम्यान आयोजित या उपक्रमात दक्षिण आशियाई आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट समुदायांत सृजनशील आणि आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन दिले जाते. माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री डॉ. एल मुरुगन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, तसेच चित्रपट उद्योगाचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात फिल्म बझारचे जगभरातील चित्रपट ग्राहक आणि विक्रेत्यांसाठी आकर्षण असते. चित्रपट, वितरण आणि निर्मिती मधील दक्षिण आशियातील कंटेंट आणि कौशल्य शोधून त्याला मदत करण्यावर फिल्म बझारचा भर असतो. जागतिक सिनेमाची दक्षिण आशियाई क्षेत्रात विक्री करण्यात देखील फिल्म बझारची महत्वाची भूमिका असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -