Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेमुरबाडमध्ये मुसळधार पाऊस; शेतकरी वर्ग हवालदिल

मुरबाडमध्ये मुसळधार पाऊस; शेतकरी वर्ग हवालदिल

भात कापणी पडली लांबणीवर!

मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी पट्ट्यात तसेच मुरबाड शहर परिसरात मागील दोन आठवड्यात हत्ती नक्षत्राच्या पावसाने मोठ्या प्रमाणात धिंगाणा घालून पाऊस बरसला होता त्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी शेतात पाणीच पाणी झाले. त्यामुळे भाताच्या पिकाला काही प्रमाणात फटका बसला आहे.

परंतु आता सोमवारी चित्ता नक्षत्र निघाल्याने पुन्हा एकदा शेतकरी वर्ग चिंतेत असतानाच मंगळवारी ठीक चार वाजता दरम्यान जोरदार मुरबाड परिसरात विजेच्या गडगडासह पाऊस बरसल्याने शेतकरी वर्ग हवालदार झाला आहे. त्यात भात कापणीचे सुद्धा लांबणीवर पडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चित्ता नक्षत्र नक्षत्र निघाल्याने हा नक्षत्र जवळपास १४ दिवस पडत असतो त्यापैकी आज पहिल्याच दिवशी जोरदार मुसळधार पाऊस बरसला आहे. त्यामुळे उरलेले काही दिवस जर चित्ता नक्षत्रचा पाऊस पडला तर शेतीचे अतोनात मोठे नुकसान होईल अशी चिंता शेतकरीवर्गाने व्यक्त केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -