Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाHardik Pandya : दोन पराभवांनंतर मुंबईच्या कर्णधाराने घेतला ब्रेक

Hardik Pandya : दोन पराभवांनंतर मुंबईच्या कर्णधाराने घेतला ब्रेक

कुटुंबासोबत वेळ घालवायला गेला हार्दिक पांड्या, चाहते नाराज

मुंबई : क्रिकेटविश्वात सध्या आयपीएलची (IPL) चर्चा आहे. मात्र, यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणार्‍या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) यंदा पहिल्या विजयासाठी करावी लागत असलेली धडपड. मुंबईचा कर्णधार म्हणून सध्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) नेतृत्व करत आहे. मात्र, रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) हार्दिकची निवड झाल्यापासूनच मुंबईचे चाहते प्रचंड नाराज झाले असून हार्दिकला ट्रोलिंगचा (Trolling) सामना करावा लागला आहे. त्यातच आता दोन पराभव पदरी पडल्यानंतर हार्दिकचं अचानक ब्रेक घेणं ट्रोलिंगचा विषय ठरत आहे. हार्दिक आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवण्यासाठी गेला आहे. मात्र, मुंबईचं भवितव्य धोक्यात असताना हार्दिकचं असं ब्रेक घेणं चाहत्यांच्या जिव्हारी लागलं आहे.

आयपीएल २०२४ सुरु झाल्यापासून एकही सामना मुंबई इंडियन्सला जिंकता आलेला नाही. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध २४ मार्चला गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या लढतीत मुंबईचा ६ धावांनी पराभव झाला होता. दुसरीकडे सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबईचा ३१ धावांनी पराभव झाला होता. यानंतर मुंबईची पुढील मॅच १ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. या दरम्यानच्या काळात हार्दिक पांड्या त्याच्या घरी पोहोचला असून त्याने काही वेळ कुटुंबीयांसोबत घालवण्याचा निर्णय घेतला आहे.

सनरायजर्स हैदराबाद यांच्याविरोधातील मॅच नंतर मुंबईची टीम दिल्लीत परतल्यानंतर हार्दिक पांड्या लगेचच त्याच्या मुंबईतील घरी निघून गेला. हार्दिक पांड्या पुन्हा आराम करुन राजस्थान विरुद्धच्या मॅचसाठी तयार होईल. त्याने टीमसोबत राहण्याऐवजी कुटुंबीयांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने मुंबईचे चाहते मात्र नाराज झाले आहेत.

हार्दिकसाठी यंदाचं आयपीएल खास नाही

हार्दिक पांड्याला यंदाचं आयपीएल चांगलं गेलेलं नाही. हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार झाला तेव्हापासून त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. एकीकडे क्रिकेट फॅन्सकडून होणारी टीका आणि दुसरीकडे मुंबई इंडियन्सचे दोन जिव्हारी लागणारे पराभव या स्थितीचा सामना हार्दिक पांड्याने केला आहे. याशिवाय गुजरात टायटन्सच्या समर्थक प्रेक्षकांनी देखील अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्या विरोधात नारेबाजी केली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -