Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरstray dogs : वसई-विरारमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव

stray dogs : वसई-विरारमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव

चालू वर्षात किमान १५ हजार जणांना श्वान दंश

विरार (वार्ताहर) : वसई-विरार महानगरपालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांची (stray dogs) संख्या वाढली असून नागरिकांसाठी धोकादायक बनत आहे. चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत १५ हजार ७४७ जणांना श्वानदंश झाल्याची बाब समोर आली आहे.

वसई-विरारमध्ये दिवसेंदिवस श्वानांची संख्या वाढत असून मागील वर्षात जानेवारी ते डिसेंबर दरम्यान हीच आकडेवारी १८ हजारांच्या घरात होती. श्वानदंशाच्या या घटनांमुळे नागरिकांनी पालिकेकडे भटक्या कुत्र्यांना आवर घालण्याची मागणी केली आहे. श्वान दंशाबरोबरच कुत्र्यांच्या दहशतीमुळे अपघातांच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत.

वसई-विरार शहरात टोळक्याने कुत्री हल्ला करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नाक्यावर उभे असल्याने ते कधी हल्ला करतील याचा भरोसा नसल्याने या टोळक्या समोरून जाताना नागरिकांना भीती वाटत आहे. आजच्या घडीला शहरात जवळपास ८० हजाराहून अधिक भटक्या श्वानांची संख्या आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. विरार, नालासोपारा, नवघर-माणिकपूर, वसई गाव तसेच वसईच्या पश्चिमपट्ट्यात भटके श्वान वाढले आहेत.

दुचाकी वाहन चालकांच्या मागे हे श्वान लागत असल्याने अपघातही घडत आहेत. पालिका रुग्णालय, आरोग्य केंद्रात तसेच खासगी रुग्णालयात श्वानदंशाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत. चालू वर्षात जानेवारी ते आतापर्यंत १५ हजार ७४७ श्वानदंशाच्या घटना घडल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. यामध्ये सर्वाधिक घटना या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घडल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -