Saturday, April 20, 2024
Homeदेशcotton : यंदा देशात कापसाचे उत्पादन चांगले!

cotton : यंदा देशात कापसाचे उत्पादन चांगले!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदा कापसाचे (cotton) उत्पादन वाढले आहे. ३४४ लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी हा आकडा, ३०७ लाख गाठी इतका होता; पण उत्पादन वाढले तरी गि-हाईक न मिळण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. त्याला अनेक मुद्दे कारणीभूत ठरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा हवामान अनुकूल नसतानाही उत्पादनात मोठी झेप घेतली गेली आहे.

मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले असतानाही कापसाचे उत्पादन वाढले आहे. गेल्या वर्षीपेक्षा १२ टक्के जास्त उत्पादन झाले आहे; पण यंदा पिकाचा पेरा वाढल्याने एकूण उत्पादनवाढीवर परिमाण झाला आहे. यंदा दहा टक्के कापसाचा पेरा अधिक होता. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. तसेच यंदा कापसाची गुणवत्ताही चांगली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यांमध्ये भारतातल्या कापसाच्या गाठी परदेशात निर्यात करण्यात येतात; पण यंदा भारतीय कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दरांपेक्षा जास्त असल्याचा फटका निर्यातीला बसत आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत ७० टक्के कापसाची निर्यात करण्यात येते; पण यंदा हा आकडा गाठताना दमछाक होत आहे.

यंदा भारतातले कापसाचे दर जगभरातल्या कापसाच्या तुलनेत दहा टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचा दावा ‘सीएआय’चे अध्यक्ष अतुल गनात्रा यांनी केला आहे. या एका कारणामुळे कापसाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम किमतीवर होणार आहे. बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची निर्यात होते. साठ टक्के कापसाच्या गाठी बांगलादेशमध्ये पाठवण्यात येतात; पण यंदा तिकडून प्रतिसाद मिळालेला नाही. चीनकडे भारत डोळे लावून बसला आहे; पण चीनी चलनाच्या विनिमयातल्या तफावतीमुळे भारतीय कापसाला चीनमध्ये उठाव मिळणे अवघड आहे. भाव कमी असलेल्या इतर देशांच्या कापसाला जागतिक पातळीवर अधिक पसंती मिळत आहे. २०२१-२२ मध्ये कापसाच्या ४३ लाख गाठींची निर्यात करण्यात आली होती. २०२२-२३ मध्ये केवळ ३० लाख कापसाच्या गाठींची निर्यात होण्याची भीती आहे. त्यामुळे देशांतर्गत कापसाचे भाव कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -