Friday, April 19, 2024
Homeकोकणसिंधुदुर्गआचरामधील अपघाती मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

आचरामधील अपघाती मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

वीज वितरण ठेकदार एजन्सीमार्फत प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत

भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून दिलासा

मालवण (प्रतिनिधी) : विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झालेले महावितरण कंपनीचे कंत्राटी कर्मचारी यांना भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यामातून प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत देण्यात आली. सदरील धनादेश भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते मीराशी, मोंडकर कुटुंबियांना गुरुवारी देण्यात आले.

आचरा येथे वीज दुरुस्तीचे काम करत असताना, आनंद मिराशी तर इळये येथे विज दुरुस्तीचे काम करत असताना राकेश मोंडकर यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यासह अन्य संघटना पदाधिकारी, भाजप पदाधिकारी यांनी भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून विज वितरण व ठेकेदार एजन्सी यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. पहिल्या टप्प्यात मीराशी कुटुंबीयांना दोन लाख रोख स्वरूपात अडीच लाख रुपये बँक खात्यात जमा झाले होते, तर राकेश मोंडकर यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात अडीच लाख जमा करण्यात आले होते.

प्रत्येकी दहा लाख रुपये मदतीपैकी जमा रक्कम व्यतिरिक्त उर्वरित रकमेचे धनादेश मीराशी, मोंडकर कुटुंबीयांना निलेश राणे यांच्या हस्ते मालवण येथे सुपूर्द करण्यात आले. या वेळी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, रवी मालवणकर, मोहन कुबल, विजय निकम आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -