Tuesday, April 16, 2024
Homeताज्या घडामोडीराणी बागेतील त्या फलकाबाबत पालिकेचे स्पष्टीकरण

राणी बागेतील त्या फलकाबाबत पालिकेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील सगळ्यांचेच आकर्षण असलेल्या राणी बागेचे नाव हजरत हाजी पीर बाबा राणीबाग असे करण्यात आले असल्याच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अफवेबाबत पालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

राणीबागेत गेले कित्येक दशके असलेल्या दर्ग्याच्या नावाचा फलक नवा लावण्यात आला असून, त्यावरून राणीबागेचे नाव बदलल्याची सोशल मीडियावर अफवा पसरवली होती. यावरून राणीबागेचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय असेच आहे, असे प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी स्पष्ट केले आहे, तर इंग्लंडच्या राणीसाठी मुंबईच्या भायखळा येथे खास उद्यान बनवण्यात आले. त्यात प्राण, पक्षी आणि विविध प्रकारची झाडे आहेत.

सदर उद्यान १८६१ साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्वकाळात तयार झाले. इंग्लंडच्या राणीसाठी हे उद्यान बनवले असल्याने या उद्यानाचे नाव ‘व्हिक्टोरिया गार्डन’ असे होते, त्याला मराठीमध्ये ‘राणीची बाग’ असे म्हणत. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात या उद्यानाचे नामांतर ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय’ असे करण्यात आले.

याच राणीबागेत गेले कित्येक दशके ‘हजरत हाजी पीर बाबा’ यांचा दर्गा आहे. ‘हजरत हाजी पीर बाबा’ राणी बागवाले म्हणून त्याची ओळख आहे. राणी बाग आंतरराष्ट्रीय पद्धतीची बनवली जात आहे. राणीबागेचे सुशोभीकरण केले जात असून याचाच एक भाग म्हणून दर्ग्याचा नामफलक नव्याने लावण्यात आला आहे.

उद्यानाचे नाव राणी बाग नाही – डॉ. संजय त्रिपाठी, संचालक प्राणिसंग्रहालय

उद्यानाचे नाव राणी बाग नसून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय असे आहे. पूर्वीच्या काळापासून लोक उद्यानास राणीबाग म्हणून संबोधत आले आहेत. तसेच जिजामाता उद्यानातील जुन्या दर्ग्याचे नाव ‘हजरत हाजी पीर बाबा ’ असे आहे.
डॉ. संजय त्रिपाठी, संचालक प्राणिसंग्रहालय

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -