Saturday, April 20, 2024
HomeदेशExit polls : गुजरातमध्ये पुन्हा 'भाजप'!

Exit polls : गुजरातमध्ये पुन्हा ‘भाजप’!

'एक्झिट पोल'चा अंदाज

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध ‘एक्झिट पोल’च्या (Exit polls) आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये भाजपची ऐतिहासिक कामगिरी होण्याची शक्यता आहे. भाजपला आतापर्यंत सर्वाधिक १२७ जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजप यापेक्षा अधिक जागा मिळवेल, अशी शक्यता या ‘एक्झिट पोल’मधून वर्तवण्यात आली आहे.

१८२ सदस्य संख्या असलेल्या गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील १९ जिल्ह्यातील ८९ जागांसाठी १ डिसेंबरला ६३ टक्के मतदान झाले होते. तर, दुसऱ्या टप्प्यात आज १४ जिल्ह्यांतील ९३ जागांसाठी ५९ टक्के मतदानाची नोंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपला ९९ जागा तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. तर, अपक्ष आणि छोट्या पक्षांना ६ जागा मिळाल्या होत्या. गुजरातच्या २०२२ च्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस विरोधात आपने देखील उमेदवार उभे केले आहेत. जन की बात यांच्या एक्झिट पोलनुसार १८२ जागांपैकी भाजपला १२९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला ४३ जागा, आपला १० जागा इतरांना एकही जागा न मिळण्याचा अंदाज आहे. पी मार्क या संस्थेच्या अंदाजानुसार भाजपला १३८, काँग्रेसला ३६, आपला ६ आणि इतरांना २ जागा मिळण्याची शक्यता आहे. टीव्ही ९ च्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला १२५ ते १३०, काँग्रेसला ४० ते ५० आपला ३ ते ५ आणि इतरांना ३ ते ७ जागा मिळू शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -