Thursday, April 25, 2024
HomeदेशExit polls : दिल्ली महापालिकेत 'आप' सरस!

Exit polls : दिल्ली महापालिकेत ‘आप’ सरस!

नवी दिल्ली : ‘आप’ची ‘झाडू’ दिल्ली महापालिकेत मोठी उलथापालथ करणार असल्याचे संकेत ‘एक्झिट पोल’ (Exit polls) मधून मिळत आहे. दिल्ली विधानसभेत ‘आप’च्या अरविंद केजरीवालांची एकहाती सत्ता होती, परंतू महापालिकेत काही ‘आप’ला सत्ता मिळविता आली नव्हती. त्यातच दिल्लीबरोबर गुजरातचीही निवडणूक लागल्याने भाजपाने ‘आप’ची कोंडी केल्याचे चित्र होते. परंतू, ‘इंडिया टुडे एक्सिस माइ इंडिया’च्या ‘एक्झिट पोल’नुसार ‘आप’ दिल्ली महापालिकेत भाजपाची सत्ता उलथवून टाकताना दिसत आहे.

दिल्लीत ‘आप’ला १४९ ते १७१ जागा मिळताना दिसत आहेत. तर सत्ताधारी भाजपाला फक्त ६९ ते ९१ जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेसला अवघ्या ३ ते ७ जागा मिळतील. तसेच इतरांच्या खात्यात ५ ते ९ जागा जाताना दिसत आहेत. दिल्ली एमसीडीच्या २५० जागांवर मतदान झाले होते. दिल्लीत आपला ४६ टक्के महिलांनी आणि ४० टक्के पुरुषांनी मतदान केले आहे. भाजपाला ३४ टक्के महिलांनी आणि ३६ टक्के पुरुषांनी मतदान केल्याचे यातून दिसत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -