Thursday, April 25, 2024
Homeकोकणरायगडकाशीद बीचवर उत्साहाला उधाण

काशीद बीचवर उत्साहाला उधाण

रणरणत्या उन्हातही पर्यटकांनी लुटला आनंद

संतोष रांजणकर

मुरुड : पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध अशा काशीद बीचवर मे महिन्याच्या तिसऱ्या वीकेंडलाही रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. रणरणत्या उन्हातही पर्यटकांनी समुद्रात पोहोण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

काशिदचा समुद्र किनारा हा भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी, उसळणाऱ्या मोठाल्या लाटा, किनाऱ्यावरील शुभ्र वाळू यामुळे पर्यटकांना आकर्षित करतो. पर्यटकांच्या सोयी-सुविधांसाठी याठिकाणी असलेली स्पीडबोट, पँरासेलिंगबोट, बनाना, बंफर राईड तसेच घोडा-उंटावरील सफर या गोष्टी पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करतात. या सगळ्याचा पर्यटक मनसोक्त आनंद लुटताना दिसत होते. या ठिकाणी विविध खाद्य-पेय चहा-नाष्टा यांची सोय उपलब्ध आहेत. याठिकाणी दर शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात.

रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी ट्राफिक जॅमलाही सामोरे जावे लागते. देश-विदेशातील पर्यटक येथे आवर्जून भेट देत असतात. त्यामुळे काशिद बीचला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मे महिना असला तरी रविवारी सकाळच्या वेळी ढगाळ वातावरण व नंतर दुपारी प्रचंड उकाडा यामुळे पर्यटकांनी काशिदच्या समुद्रात पोहोण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -