Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीपाकिस्तानातील कराचीत इंडिगो विमानाचे एमर्जन्सी लँडिंग

पाकिस्तानातील कराचीत इंडिगो विमानाचे एमर्जन्सी लँडिंग

कराची : इंडिगो विमानाचे पाकिस्तानातील कराचीत लँडिंग करण्यात आले आहे. हे विमान शारजाहून हैदराबादला जात होते, असे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडीमुळे विमान उतरवण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडाची माहिती मिळाल्यानंतर, क्रू मेंबर्सनी विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.

दोन आठवड्यांत कराचीमध्ये भारतीय विमानाचे हे दुसरे एमर्जन्सी लँडिंग आहे. इंडिगो एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, शारजा-हैदराबाद विमानात पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानाला कराचीच्या दिशेने वळवण्यात आले. या विमानातील प्रवाशांना हैदराबाद येथे जाण्यासाठी एका अतिरिक्त विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

यापूर्वी स्पाईसजेटच्या बोईंग ७३७ विमानात बिघाड झाल्यानंतर ५ जुलै रोजी कराचीमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. स्पाइसजेटचे हे विमान दिल्लीहून दुबईला जात होते. या बिघाडानंतर विमानाला पाकिस्तानातील कराचीत उतरावे लागले. स्पाईसजेटच्या दुसऱ्या विमानाने प्रवाशांना दुबईला नेण्यात आले. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी जयपूरमध्ये इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. इंजिनला कंपन आल्यानंतर हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -