Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणत्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उल्हास नदीवर दीपोत्सव

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उल्हास नदीवर दीपोत्सव

१५०० दिव्यांनी सजला विसर्जन घाट

नरेश कोळंबे

कर्जत : कर्जत येथे उल्हास नदीवर त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून उल्हास नदी निर्मल जल अभियान यांच्या वतीने उल्हास नदीच्या गणेश विसर्जन घाटावर उल्हास दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात दिव्यांची आरास केल्याने उल्हास नदीचे एक वेगळे रूप यावेळी पाहायला मिळाले.

त्रिपुरारी पौर्णिमेला हिंदू संस्कृतीत महत्वाचे मानले गेले आहे. म्हणूनच या दिवशी लोक अनेक दिव्यांची रोषणाई करत असतात. कर्जत मधील उल्हास नदी ही जीवनदायिनी आहे, अनेक शेतकरी ह्या पाण्यावर अवलंबून आहेत परंतु गेल्या काही वर्षात ह्या नदीने आपले सौंदर्य गमावले आहे म्हणुनच ती स्वच्छ ठेवली पाहिजे आणि त्या नैसर्गिक जलस्त्रोताचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे आणि त्याच कर्तव्याची जाणीव नागरिकांना करून देण्यासाठी उल्हास दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता.

हा दीपोत्सव उल्हास नदीच्या गणेश विसर्जन घाटावर करण्यात आला. यावेळी १५०० हून अधिक दीप समस्त कर्जतकरांनी उल्हास नदीकिनारी प्रज्वलित केले होते. हे दीपोत्सवाचे दुसरे वर्ष असल्याचे, उल्हास नदी निर्मल जल अभियानाचे समीर सोहोनी यांनी सांगितले.

यावेळी दीपोत्सवास कर्जत नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक राहुल डाळिंबकर यांनी उपस्थिती दर्शवली.

तसेच भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भारतात आलेले फ्रेंच नागरिक मिस्टर क्विंटन हे सुद्धा दीपोत्सवास उपस्थित होते. त्यांनी उल्हास नदी निर्मल अभियानाचे समीर सोहोनी आणि मुकुंद भागवत यांच्या या नदी बचाव कार्यक्रमाचे आणि उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -