Friday, April 19, 2024
Homeमहामुंबईपवई तलावाभोवती सायकलिंग ट्रॅक बेकायदेशीर

पवई तलावाभोवती सायकलिंग ट्रॅक बेकायदेशीर

उच्च न्यायालयाचा पालिकेला दणका

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जाणारा पवई तलाव सायकल आणि जॉगिंग ट्रॅक उच्च न्यायालयाने अनधिकृत ठरवला आहे. त्या जागेवर कोणतेही काम न करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत.

पवई तलाव नजीक उभारण्यात येणाऱ्या सायकल आणि जॉगिंग ट्रॅक प्रकल्पावर मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिश्त यांच्या खंडपीठाने प्रश्नचिन्ह उपस्थित करत सायकल ट्रॅक अनधिकृत ठरवला आहे. सुनावणी दरम्यान पालिकेकडून मांडलेले मुद्दे न पटण्यासारखे होते. तसेच तलावाचा परिसर हा २०३४ च्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार हरितपट्टा दाखवण्यात आला आहे.

त्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारच्या बांधकामास मनाई असताना पालिकेकडून सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक बांधण्यात येत आहे. तर पवई तलाव परिसर पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेतल्याचा दावा केला आहे.

मात्र हे मुद्दे न्यायालयाला न पटण्यासारखे होते. यामुळे या प्रकल्पाला अनधिकृत ठरवण्यात आले आहे. तर पर्यावरण प्रेमींनीही याला आधीच विरोध केला होता. या प्रकल्पामुळे मगरींच्या अधिवासावर परिणाम होईल अशी भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -