Tuesday, April 23, 2024
Homeदेशचीनने अरूणाचलमधील ३० ठिकाणांची नावे बदलली, परराष्ट्र मंत्री म्हणाले- काहीही फरक पडणार...

चीनने अरूणाचलमधील ३० ठिकाणांची नावे बदलली, परराष्ट्र मंत्री म्हणाले- काहीही फरक पडणार नाही

नवी दिल्ली: अरूणाचल प्रदेशवर आपला दावा ठोकण्याच्या आणखी एका प्रयत्नात चीनने भारतातील पूर्वोत्तर राज्यामध्ये एलएसीसोबत विविध ठिकाणच्या ३० नव्या स्थानांची चौथी यादी जाहीर केली. परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे दावे फेटाळून लावत म्हटले की अरूणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील. हे पहिल्यांदाच घडलेले नाही की चीनने भारतीय क्षेत्रातील ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न केला.

चीनच्या नागरी मंत्रालयाचे हे कृत्य अरूणाचल प्रदेशातील स्थानांवर दावा ठोकण्याचा नवीन प्रयत्न आहे. चीनने अरूणाचल प्रदेशमधील काही ठिाकणांची भौगोलिक नावांची यादी जाहीर केली. चीनने ज्या ३० ठिकाणांची नावे बदलली त्यात १२ डोंगर, चार नद्या, एक तलाव, एक डोंगराळ भाग, ११ राहण्याची ठिकाणे आणि जमीनीच्या तुकड्याचा समावेश आहे. चीनने या नावांना चीनच्या अक्षरांमध्ये लिहिले आहे.

२०१७मध्ये बीजिंगने अरूणाचल प्रदेशातील सहा जागांसाठी स्टँडर्डाईज्सत नावांची प्रथम यादी जाहीर केली होती. यानंतर २०२१मध्ये १५ स्थानांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर २०२३मध्ये ११ अतिरिक्त स्थानांची एक यादी जाहीर करण्यात आली होती

यातच भारताने मात्र चीनचे हे दावे फेटाळून लावले आहेत. भारताने म्हटले आहे की अरूणाचल प्रदेश हे राज्य भारताचा अविभाज्य भाग होता आणि नेहमीच राहील. येथील ठिकाणांना आपली नावे दिल्याने तो भाग आपला होत नाही. याबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, जर मी तुमच्या घराचे नाव बदलले तर ते माझे होईल का? अरूणाचल प्रदेश हे भारताचे राज्य होते, आहे आणि नेहमीच राहील. नाव बदलण्याने कोणताही परिणाम होत नाही. आमचे सैन्य नियंत्रण रेषेवर तैनात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -