Friday, March 29, 2024
Homeमहामुंबईमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त रविवारी पहाटे श्री विठ्ठलाची महापूजा

मुंबई (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे रविवार १० जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. या महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल.

शनिवार ९ जुलै रोजी पुणे येथून मोटारीने पंढरपूरकडे प्रयाण. रात्री पंढरपूर येथे रात्री ११.३० वा. आगमन व शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ कार्यक्रमाच्या समारोपास उपस्थिती.
रविवार १० जुलै रोजी मध्यरात्री २.३० ते पहाटे ४.३० श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजेसाठी उपस्थिती.
पहाटे ५.३० वा. विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॅान आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन.
पहाटे ५.४५ वा. नदी घाटाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सकाळी ११.१५ वा. शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील सुंदर माझे कार्यालय या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणास उपस्थिती.
सकाळी ११.४५ वा. पंचायत समिती पंढरपूर येथे ‘स्वच्छता दिंडी’ समारोपास उपस्थिती. दु. १२.३० वा. पक्ष मेळाव्यास उपस्थिती.
दुपारी ३ वा. मोटारीने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण व तेथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण. सायं. ४.३० वा. मुंबई विमानतळ येथे आगमन व ठाण्याकडे प्रयाण.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -