Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनछत्रपतींची भूमिका, मोठी जबाबदारी : अक्षय कुमार

छत्रपतींची भूमिका, मोठी जबाबदारी : अक्षय कुमार

वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

या चित्रपटात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. अक्षय कुमार म्हणाला की, मला खूप आनंद झाला आहे की, महेश मांजरेकर याने दिग्दर्शन केलेल्या चित्रपटात मी काम करणार आहे. आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहोत. मी सर्वांना सांगू इच्छितो की, मला या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी राज ठाकरे यांच्यामुळे मिळाली. ते मला म्हणाले की, तू ही भूमिका कर. मी ही भूमिका साकारणार ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी खूप जबाबदारीचे काम आहे’. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अक्षयसोबतच अभिनेता प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्या मांजरेकर, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.

अक्षय कुमारचे २०२२ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले नाहीत. सम्राट पृथ्वीराज, कटपुतली, रक्षाबंधन हे अक्षयचे चित्रपट फ्लॉप ठरले. अक्षयच्या ‘राम सेतू’ चित्रपटाची निर्मिती २०० कोटींच्या बजेटमधून करण्यात आली. पण या चित्रपटाने आतापर्यंत एकूण ६१.९० कोटी रुपये कमावले आहेत. आता अक्षयचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर लवकरच चाहत्यांना मिळेल.

या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी राज ठाकरे यांच्यामुळे मिळाली. ते मला म्हणाले की, तू ही भूमिका कर. मी ही भूमिका साकारणार ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

येतोय ‘बालभारती’

नितीन नंदन दिग्दर्शित आणि ‘स्फियरओरिजीन्स’ निर्मित ‘बालभारती’ हा मराठी चित्रपट २ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रकाशित करण्यात आले. या २३ सेकंदांच्या मोशन पोस्टरमध्ये चित्रपटातील आघाडीचे कलाकारांची झलक दिसते. एकंदर पोस्टर पाहता हा चित्रपट आणि त्याचा विषय किती वेगळा आहे हे लक्षात येते. ‘बालभारती’चे दिग्दर्शन नितीन नंदन यांचे आहे आणि निर्मिती ‘स्फियरओरिजीन्स’ यांनी केलेली आहे. ‘बालभारती’मध्ये सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर, उषा नाईक, आर्यन मेंघजी, रवींद्र मंकणी हे आघाडीचे कलाकार प्रमुख भूमिकेत असून अभिजित खांडकेकर विशेष भूमिकेत दिसणार आहे.

या मोशन पोस्टरचा नवखेपणा म्हणजे, यात आर्यन मेंघजी हा बाल कलाकार ‘आईनस्टाइन’च्या भन्नाट रूपात अनेक गॅझेटच्या गराड्यात बसलेला दिसतो. समोर एक पेंड्यूलम म्हणजे लोलक हलताना दिसतो. त्यावर मराठी व इंग्लिश आद्याक्षरे लिहिलेली आहेत. त्यात एक आयडिया त्याच्या डोक्यात येते आणि तिची चमक त्याच्या चेहऱ्यावर दिसते, त्याचे डोळे चकाकतात. मग गंमत सुरू होते. एक एक कलाकार दिसू लागतात. नंदिता पाटकर ‘टॉक इन इंग्लिश’ लिहिलेले हेल्मेट घालून येते, अभिजित खांडकेकर मुलाचे कौतुक करतो आणि पहिल्यांदाच वडिलांच्या भूमिकेतील सिद्धार्थ जाधव मोठ्या तन्मयतेने इंग्लिश – मराठी डिक्शनरी वाचताना दिसतो. मग शेवटी एक विमान उडत जाते आणि समोर शब्द येतात… ‘मीट द न्यू चाइनस्टाइन!’

हे मोशन पोस्टर प्रेक्षकांना या चित्रपटाच्या विषयावर विचार करायला नक्की भाग पाडेल. पालकांच्या मनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल असलेली चिंता. तीच ‘बालभारती’मध्ये रंगवलेली आहे. सर्व आई-वडील नेहमी हा विचार करत असतात की, आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मळावे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत आणि सद्यपरिस्थितीत रुजलेली ही आजची कथा आहे. म्हणून आजच्या प्रत्येक घराची ही कथा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यामध्ये मराठी भाषा, सर्जनशीलता आणि नावीन्य किंवा संशोधन यांचा मिलाफ आहे.

‘हेल द इनोव्हेशन’ हे आजचे परवलीचे शब्द इथे अगदी समर्पक वाटतात आणि त्याला ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान व जय संशोधन’ या नवीन घोषणेचे पाठबळ मिळाले आहे. चित्रपटाबद्दल बोलताना नितीन नंदन म्हणाले, ‘बालभारती’ हा चित्रपट प्रत्येक महाराष्ट्रीय कुटुंबाशी जोडला जाईल. हा प्रत्येक पालक, विद्यार्थी आणि शिक्षकाचा चित्रपट आहे’. निर्माते कोमल आणि संजोय वाधवा म्हणाले, ‘हा चित्रपट आम्ही अगदी मनापासून आणि मोठ्या श्रद्धेने निर्माण केला आहे. आम्हाला खात्री आहे की चित्रपट पाहणारे प्रत्येक कुटुंब या विषयाशी सहमत होईल आणि त्यांना मजा येईल’.

-दीपक परब

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -