Thursday, March 28, 2024
Homeक्रीडाCheteshwar Pujara: पुजाराने केल्या २०००० धावा, सचिन, गावस्कर आणि द्रविडच्या क्लबमध्ये एंट्री

Cheteshwar Pujara: पुजाराने केल्या २०००० धावा, सचिन, गावस्कर आणि द्रविडच्या क्लबमध्ये एंट्री

मुंबई: भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने एका खास क्लबमध्ये एंट्री घेतली आहे. खरंतर चेतेश्वर पुजारा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २० हजार धावा कऱणारा चौथा फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि राहुल द्रविड यांनी ही कामगिरी केली होती. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कऱणाऱ्यांच्या यादीत भारताचा लिटिल मास्टर सुनील गावस्कर पहिल्या क्रमांकावर आहे. लिटिल मास्टरने ३४८ फर्स्ट क्लास सामन्यात ५१.४६ च्या सरासरीने २५८३४ धावा केल्या आहेत. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ८१वेळा शतक ठोकले.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

या यादीत सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर ३१० फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यांमध्ये २५३९६ धावा आहेत. मास्टर ब्लास्टरने फर्स्ट क्लास क्रिकेट करिअरमध्ये ८१ शतक ठोकले आहेत. तिसऱ्या स्थानावर राहुल द्रविड आहे. भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविडे २९८ फर्स्ट क्लास सामन्यात २३७९४ धावा केल्या. द वॉल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या द्रविड यांनी फर्स्ट क्लास करिअरमध्ये ५५.३३च्या सरासरीने धावा केल्यात. याशिवाय त्यांनी ६८वेळा शतक ठोकले आहे.

आता चेतेश्वर पुजाराची एंट्री

आतापर्यंत चेतेश्वर पुजाराने २६० फर्स्ट क्लास क्रिकेट सामने खेळले आहेत. यात पुजाराने २०००१३ धावा केल्यात. फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये या फलंदाजांने ५१.९६च्या सरासरीने धावा केल्या. त्याच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ६१ शतके आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -