Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरBoisar Fire : बोईसरमध्ये अंग्नितांडव; आगीत १५ भंगाराची गोदामे भस्मसात, तर एक...

Boisar Fire : बोईसरमध्ये अंग्नितांडव; आगीत १५ भंगाराची गोदामे भस्मसात, तर एक पिकअप जळून खाक

बोईसर : बोईसर येथील अवध नगर भागातील भंगार गोडाऊनला रात्री दोन वाजताच्या सुमारास लागलेल्या अग्नितांडवात (Boisar Fire) भंगाराची १५ गोडाऊन जळून खाक झाली. त्यातच बिपरजॉय चक्रीवादळाच्या वादळी वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप घेतले. आगीशी झुंज देत पहाटे साडे सहा वाजताच्या सुमारास तारापूर अग्निशमन दलाच्या जवानांना सहा गाड्यांसह आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे उभारण्यात आलेली बांधकामे, चाळी, बेकायदेशीर गोदामे याकरिता अवध नगर परिसर ओळखले जाते. याठिकाणी सुमारे दोन ते तीन एकरमध्ये दाटीवाटीने उभारण्यात आलेली ही भंगार गोडाऊन असून, या भीषण आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी एक पिकअप गाडी जळून खाक झाली आहे़ तर दोन छोटे टेम्पो व लागून असलेली वीस ते पंचवीस गोडाऊन वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

हे अग्नितांडव आटोक्यात आणण्यासाठी तारापूर एमआयडीसी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या, पालघर नगरपरिषद १, तारापूर अणुऊर्जा केंद्र १, वसई-विरार महानगरपालिका १ व डहाणूच्या अदानी पॉवर स्टेशनची १ गाडी अशा एकूण सहा अग्निशमन गाड्यांवरील जवान शर्तीचे प्रयत्न करीत होते.

दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता प्रचंड अडचणी येत होत्या, पाच तासांच्या अथक प्रयत्नाअंती अग्नीशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी सकाळी १० वाजता पुन्हा आगीने थोडे डोके वर काढले होते.त्या वेळी पुन्हा लागलीच आग विझविण्यात आली. सदर आग विझविण्यासाठी सुमारे दीड ते दोन लाख लिटर पाणी लागले असुन सुदैवाने ती आग लोकवस्तीपर्यंत पोहोली नसल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी मात्र दाटीवाटीने उभारण्यात आलेल्या या भंगार गोदामांवर संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान लागलेल्या आगीचे निश्चित कारण स्पष्ट झाले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -