Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर

मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर

मुंबईतील रंगशारदा सभागृहात पार पडला हा कार्यक्रम

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर केली. मुंबईतील रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालिकेकडून आरक्षित आणि अनारक्षित वॉर्डांची यादी जाहीर करण्यात आली.

शिवसेना, भाजप, काँग्रेसच्या दिग्गज नगरसेवकांना आता दुसऱ्या वॉर्डमधून निवडणुकीची संधी शोधावी लागणार आहे. शिवसेना नगरसेवक अमेय घोले, काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. तर काही वॉर्डमधील आरक्षणामुळे काही विद्यमान नगरसेवकांना पर्याय शोधावा लागणार आहे.

ओबीसी आरक्षण वगळून महिला सर्वसाधारण, महिला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागांसाठी ही सोडत होती.

सर्वोच्च न्यायालयाने चार मे रोजी दिलेल्या आदेशात चार आठवड्यांत पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील १४ महापालिकांना ३१ मेपर्यंत आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिले होते. मुंबईत यंदा नऊ प्रभागांची वाढ होऊन २२७ वरून २३६ प्रभाग झाले आहेत.

आरक्षणावर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी मुंबईतील २४ प्रभागांमध्ये यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. सहा जूनपर्यंत नागरिकांना आपल्या सूचना या कार्यालयात देता येतील. १३ जून रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.

अनुसुचित जातीसाठी राखीव प्रभाग असलेले प्रभाग

६०, ८५, १०७, ११९, १३९, १५३, १५७, १६२, १६५, १९०, १९४, २०४, २०८, २१५ व २२१ हे प्रभाग अनुसुचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

या प्रभागांपैकी सन २००७, २०१२ व २०१७ च्या निवडणुकीत अनुसूचित जातीच्या स्त्रियांसाठी कोणताही प्रभाग आरक्षित नसल्याने नमूद १५ प्रभागांतून ८ प्रभाग स्त्रियांसाठी सोडतीद्वारे निवडण्यात आले.

अनुसुचित जातींतील महिलांसाठी आरक्षित वॉर्ड

अनुसुचित जातीतील महिला गटांसाठी 139, 190,194, 165, 107, 85, 119, 204 हे प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. या वॉर्डमधील विद्यमान पुरुष नगरसेवकांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे.

महिलांसाठी 53 वॉर्ड आरक्षित

प्राधान्यक्रम 1 (53) प्रभाग क्रमांक – 2, 10, 21, 23, 23, 25, 33, 34, 49, 52, 54, 57, 59, 61, 86, 90, 95, 98, 100, 104, 106, 109, 111, 118, 121, 122, 134, 144, 145, 150, 156, 159, 169, 170, 171, 172, 175, 178, 182, 184, 189, 191, 192, 201, 202, 205, 207, 212, 213, 218, 229, 230 आणि 236

प्राधान्य क्रम 2 (33) प्रभाग क्रमांक – 5, 28, 29, 39, 45, 46, 64, 67, 69, 74, 80, 92, 103, 120, 125, 131, 142, 147, 151, 163, 168, 177, 181, 186, 187, 196, 220, 225, 226, 227, 231, 233 आणि 234

सर्वसाधारण महिला आरक्षित (23) प्रभाग क्रमांक – 44, 102, 79, 11, 50, 154, 155, 75, 160, 81, 88, 99, 137, 217, 146, 188, 148, 96 , 9, 185, 130, 232, 53

प्रभाग क्रमांक २७, ५५, ९५, ९८, १११, १२१, १२४, १२६, १२९, १३७, १४५, १४६, १४७,१५०, १५१,१५२, १५४, १५५ १५६, १५९. १६०, १७५, १७९, १८७, १८९, १९२, १९५, २०२, २०३, २०६, २०७, २१८, २२४ व २३४ हे सन २००७, २०१२ व २०१७ च्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते त्यांना आता वगळण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -