Thursday, March 28, 2024
Homeक्रीडाआयपीएल आयोजनातील वाईट काळ संपला : सौरव गांगुली

आयपीएल आयोजनातील वाईट काळ संपला : सौरव गांगुली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आयपीएल आयोजनातील वाईट काळ संपला आहे. भविष्यात ही लीग भारतात खेळण्यात कुठलीही बाधा येणार नाही, असा विश्वास बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाशी निगडीत अनेक समस्या असतानाही युएईत आयपीएल स्पर्धा पूर्ण करू शकलो. आयपीएल ही बीसीसीआयची स्पर्धा आहे आणि ती भारतात खेळली जाते, तेव्हा ते वेगळे वातावरण असते. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू आहे. आम्ही न्यूझीलंडचे यजमानपद भूषवले. आपला संघ आता दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि श्रीलंका संघ आपल्याकडे येईल. आमचे देशांतर्गत क्रिकेट पूर्वीप्रमाणेच पूर्ण प्रवाहात आहे. गेल्या वर्षी ब्रेक होता. आम्ही जवळजवळ प्रत्येक स्पर्धा पूर्ण केली आहे. रणजी करंडक जानेवारीपासून सुरू होत आहे. ज्युनियर स्तरावरील क्रिकेट सुरू आहे. विजय हजारे ट्रॉफी सध्या भारतात सुरू आहे, असे गांगुली म्हणाले.

कोरोनामुळे आयपीएल २०२१ आणि टी-ट्वेन्टी वर्ल्डकप २०२१ चा उर्वरित हंगाम भारताऐवजी परदेशात आयोजित करता आला नाही. त्यासाठी युएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीला प्राधान्य देण्यात आले. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२१ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. आता पुढील हंगामासाठी मेगा ऑक्शन होणार असल्याने सर्व प्रमुख क्रिकेटपटूंची अदलाबदल होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -