Thursday, April 25, 2024
Homeअध्यात्मबाबांची अगाध लीला...

बाबांची अगाध लीला…

मी टॅक्सी ड्रायव्हर असून प. पू. राऊळ महाराजांना मी रत्नागिरी ते कुडाळ येथे नेण्याचे काम करीत होतो. त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे मला त्यांचे अनेक चमत्कार दिसून आले. त्यापैकी काही चमत्कार म्हणा किंवा महाराजांची अगाध दैवी शक्ती म्हणा, त्याची प्रचिती आली. एकदा रत्नागिरी येथील एक प्रसिद्ध उद्योगपतींनी मला सांगितले की, ‘पिंगुळीचे प्रसिद्ध संत श्री राऊळबाबा रत्नागिरीत आलेले आहेत. त्यांना घरी बोलावून आण’. त्यावेळी मी त्यांना विचारले, बाबा आता कुठे मुक्कामाला आहेत तेवढे सांग; परंतु बाबा त्याच हॉटेलात बसले होते.

पण मी अगोदर त्यांना पाहिलेले नसल्यामुळे आबा पेडणेकर यांनीच मला महाराजांबद्दल सांगितले व महाराजांची ओळख करून दिली. मी त्यावेळी त्यांच्या पाया पडले. त्यांचा अवतार पाहता, ते साधेसुधे होते. त्यांच्या अंगावर धड कपडा नाही, भगवी वस्त्रे नाहीत किंवा दाढी पण वाढलेली नव्हती. बाबांच्या पाया पडल्यानंतर त्यांनी मला पेढा दिला. तो घेऊन मी बाहेर आलो. तेव्हा आबा पेडणेकरने सांगितले की, बाबांना घेऊन कुडाळला जा व त्यांना सोडून ये. पण माझी गाडी एवढे अंतर जाऊन येण्याच्या अपेक्षेबाहेर होती. त्याशिवाय त्यावेळी रत्नागिरीत पेट्रोलची पण टंचाई होती. त्यामुळे मी बाबाना घेऊन जाण्यास असमर्थता दर्शविली; परंतु आबा पेडणेकरनी मला सांगितले, तू काहीच काळजी करू नकोस. तुझी व तुझ्या गाडीची काळजी बाबानांच आहे. तू कुडाळला जाऊन ये.

त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी महाराजांना घेऊन कुडाळला गेलो व त्यांना तिथे पोहोचवून परत पण आलो; परंतु गाडीने कसलीही कुरकुर केली नाही किंवा गाडीतील पेट्रोल पण एक थेंबही खर्च झाले नाही. मी गाडी घेऊन जाताना जेवढे पेट्रोल होते तेवढेच एवढा प्रवास करूनसुद्धा होते. म्हणजेच हा चमत्कार राऊळ महाराजांशिवाय कोण करणार?

त्याचप्रमाणे मी एकदा रत्नागिरी येथील एका प्रसिद्ध कारखान्याच्या मालकास घेऊन देवगड येथे जात होतो. वाटेत कोंड्ये येथे महाराजांची गाडी बंद पडली होती व महाराज एका झाडाखाली बसून भजन करीत होते. मी खाली उतरून महाराजांच्या पाया पडलो. त्यावेळी मी त्यांना विचारले की, आपण कुठे चालला आहात? महाराज उत्तरले. ‘आम्ही मुंबईला जात आहोत. पण गाडी बंद पडल्यामुळे येथेच अडकून पडलो आहोत. तेव्हा पोरा तू तरी बघ आमची गाडी चालू होते काय ? मी गाडीजवळ जाऊन क्षुल्लक दुरुस्ती केली व लवकरच गाडी पण चालू झाली. खरोखरच बाबांची लीला अगाध आहे.

-समर्थ राऊळ महाराज

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -