Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरॲटोमोबाइलच्या विद्यार्थ्यांनी बनवली बोटकार

ॲटोमोबाइलच्या विद्यार्थ्यांनी बनवली बोटकार

जमीन, पाण्यावरही चालणारी कार कॉलेजमध्ये ठरतेय आकर्षण

  • वीस दिवसांत बनवली कार
  • वीस हजारांचा आला खर्च

वाडा (वार्ताहर) : ॲटोमोबाइल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी जमीन व पाण्यावर चालणारी बोटकार बनवली आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे. तन्मय पाटील (चिंचघरपाडा, ता. वाडा), प्रणय हाराळे (नवी मुंबई), दीप्तेश मांढरे (खांबाळा ता. भिवंडी), चिन्मय चव्हाण (डोंबिवली) अशी त्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

शहापूर येथे शिवाजीराव जोंधळे महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना महाविद्यालयाकडून प्रकल्प बनवायला सांगितला असता या चौघांनी एकत्र येऊन बोटकारची संकल्पना मांडली. त्यानंतर त्यांनी यूट्यूबवर सर्च करीत १९८५ साली बनवलेली ब्रिटिशकालीन कार बघितली व त्याप्रमाणे त्यांनी एक वेगळ्या धाटणीची बोटकार बनवायला सुरुवात केली.

यासाठी त्यांनी फायबर टॅक, बॉक्स पाइप, स्प्लेंडर दुचाकीचे इंजिन, लोडो टायर, कास्टिंग रॉड, मेटल प्लेटस, डिस्क ब्रेक, चेन ड्राय व इको गाडीचे स्टिअरिंग असे साहित्य वापरून त्यांनी जमिनीवर व पाण्यावर चालणारी कार बनवली असून तिची चाचणी घेतली असता ती दोन्ही ठिकाणी व्यवस्थितरीत्या चालत आहे. ही कार बनवण्यासाठी त्यांना २० दिवसांचा कालावधी लागला.

यासाठी २० हजारांचा खर्च आला आहे. या कामी त्यांना इंजिनीअर कॉलजचे शिक्षक दीपक पाटील, महेंद्र पाटील, शिवाजी अय्यर यांचे मार्गदर्शन लाभले. बोटकार यशस्वीपणे साकारल्यानंतर तिला प्रकल्पासाठी जोंधळे महाविद्यालयात ठेवण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -