Saturday, April 20, 2024
Homeमहत्वाची बातमीमुंबईतील सर्व शाळा ३१ जानेवारीपर्यंत पुन्हा बंद

मुंबईतील सर्व शाळा ३१ जानेवारीपर्यंत पुन्हा बंद

मुंबई : कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूचा कहर आता पुन्हा एकदा वाढतो आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढला असून त्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई क्षेत्रातल्या दहावी, बारावी वगळता सर्व माध्यमिक शाळा ३१ जानेवारीपर्यंत पुन्हा बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात आला आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद राहतील, असे महानगरपालिकेचे आयुक्त आयएस चहल यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.१० वी व १२ वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाळी बंद ठेऊन ऑनलाईन पध्दतीने सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत एक पत्र जाहीर करण्यात आले आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, सद्यस्थितीत जगातील काही देशामध्ये व बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा प्रसार वाढत असल्याने मुंबईची एकूण लोकसंख्या तसेच या शहरात जगभरातून लोकांचे येणे जाणे सुरू असल्याने या नव्या प्रजातीचा प्रसार होऊ नये म्हणून कोरोनाचा (ओमिक्रॉन) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.१० वी व १२ वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग (इ. १ ली ते इ.९ वी व ११ वी ) असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा दि. ०४ जानेवारी ते दि. ३१ जानेवारी २०२२ पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येत आहेत.

तथापि, इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी या वर्गातील विद्याथ्याने प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने अध्ययन अध्यापनाचे कार्य सुरु राहणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळेतील १५ ते १८ वर्ष वयोगट असलेल्या विद्यार्थ्याचे नियोजनानुसार लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण सुरु राहणार आहे. याकरीता महापालिका शाळांसह अन्य खाजगी शाळांमधील लसीकरणास पात्र असणा-या १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्याचे लसीकरण करुन घेण्यासाठी शाळेत बोलवता येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -