Wednesday, April 24, 2024
Homeताज्या घडामोडीAirplane stuck : अमेरिकेत विजेच्या तारांमध्ये अडकले विमान!

Airplane stuck : अमेरिकेत विजेच्या तारांमध्ये अडकले विमान!

९० हजार घरांची बत्ती गुल

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : विजेच्या तारांमध्ये विमान अडकल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील मेरीलँडमध्ये घडला. या अपघातात विमानातील दोघे जण जखमी झाले असून जवळपास ९० हजार घरांची बत्ती गुल झाली आहे. या अपघाताचा व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

गेथर्सबर्ग येथे ही घटना घडली. हे शहर अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनपासून ३८ किलोमीटर अंतरावर आहे. विमानातील दोघांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.

मेरीलँड राज्यातील गॅथर्सबर्ग शहरात ही घटना घडली. एक अधिकारी स्कॉट गोल्डस्टीन यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सिंगल इंजिन असलेल्या विमानाचा अपघात झाला. न्यूयॉर्कच्या व्हाइट प्लेन्स भागातून विमानाने उड्डाण केले होते. थोड्याच वेळात ते माँटगोमेरी काउंटी एअरपार्क येथील पॉवर टॉवरला धडकले.

अग्रलेख : समाजभान राखणारा द्रष्टा अभिनेता

अपघाताची माहिती आम्हाला मिळाल्यावर तातडीने पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जमिनीपासून सुमारे १०० फूट उंचीवर एक विमान तारांमध्ये अडकल्याचे आम्ही पाहिले. वॉशिंग्टनचे ६५ वर्षीय पायलट पॅट्रिक मर्कल आणि लुईझियानाचे ६६ वर्षीय प्रवासी जेन विल्यम्स विमानात होते. दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -