नवदा : बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला पंचायतीने अजब शिक्षा (Punishment) दिली. पंचायतीने आरोपीला पाच उठाबशा काढायला सांगत नंतर सोडून दिलं. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. नवदा जिल्ह्यातील कन्नौज गावात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे.

आरोपीने अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने पोल्ट्री फार्मवर नेऊन बलात्कार केला होता. मात्र पंचायतीने आरोपीला पोलिसांकडे न सोपवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, आरोपी बलात्काराचा दोषी असल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. मुलीला एका निर्जनस्थळी नेलं असल्याने पंचायतीने आरोपीला ही शिक्षा सुनावली.

पंचायतीने आरोपीला शिक्षा म्हणून पाच उठाबशा काढायला लावल्या. या शिक्षेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर अनेकांनी याविरोधात संताप व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here