Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेकल्याणमध्ये इमारतीचा लोखंडी रॅम्प पडून ९ घरांचे नुकसान

कल्याणमध्ये इमारतीचा लोखंडी रॅम्प पडून ९ घरांचे नुकसान

कल्याण (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेजनजीक कोकण वसाहतीच्या चाळीच्या रूमवर १६ मजली निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी रॅम्प ९ रूमवर पडल्याने या रूमचे पत्रे फुटले तसेच दोन रूमवर आंब्याचे झाड कोसळल्याने या रूमचे देखील पत्रे फुटल्याची घटना घडली. सुदैवाने देवबलवत्तर असल्याने जीवितहानी झाली नाही. घराचे पत्रे फुटल्याने ११ कुटुबीयांचे संसार उघड्यावर आले आहेत.

मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने कल्याणमधील बिर्ला कॉलेजनजीक कोकण वसाहत चाळ नं. ३३ च्या ९ खोल्यांवर १६ मजली निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी रॅम्प संध्याकाळी ८च्या दरम्यान कोसळला. या घटनेत सुमारे ९ खोल्यांच्या छप्परांचे पत्रे फुटले, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

वंदना शिर्के, दीपक सुर्वे, वसंती कदम, दिंगबर चिंदरकर, संतोष सुर्वे, दिलीपकुमार चव्हाण, रंजना खरात, जयनंद कुंदर

9 houses damaged due to iron ramp of building in Kalyan

, राजू उपाध्याय यांच्या घरांचे पत्रे तुटल्याने ऐन दसरा सणाच्या तोंडावर संसार उघाड्यावर पडले आहेत, तर त्याच परिसरात आंब्याचे झाड पडल्याने अभय धनावडे, श्रीपाद कुलकर्णी यांच्या खोल्यांचे पत्रे फुटले.

कल्याण तहसीलदार विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घटनास्थळी पंचनामे करण्यासाठी पाठविले असून पंचनामे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून त्यांना लवकर मदत होईल, याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तर ‘ब’ प्रभागक्षेत्र अधिकारी जगताप यांनी घटनास्थळी बुधवारी अग्निशमन दलाच्या मदतीने पडलेले झाड काढण्याचे काम सुरू केले, असे सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -