Friday, April 19, 2024
Homeताज्या घडामोडीमाथेरानमधील विविध कामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

माथेरानमधील विविध कामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

माथेरान (वार्ताहर) :माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या प्रयत्नांतून वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी माथेरान नगरपरिषदेसाठी मंजूर करण्यात आला आहे. हा पाच कोटी रुपयांचा निधी महत्त्वपूर्ण कामासाठी खर्च करण्यात येणार आहे. पाच कोटी रुपयांमधून दोन कोटी रुपये माथेरान हद्दीतील मॅलेट स्प्रिंग मिनरल वॉटर प्रकल्प करणे या कामासाठी खर्च करण्यात येणार असून या मॅलेट स्प्रिंगमधील नैसर्गिकरित्या वाहणाऱ्या पाण्याचा सदुपयोग होणार असून येथूनच पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या भरून त्याची विक्री नगरपरिषदेच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे साहजिकच नगरपरिषदेच्या उत्पन्नात प्रमाणात वाढ होऊ शकते.

तसेच, एक कोटी रुपये माथेरान हद्दीतील हिंदू स्मशानभूमी विकसित आणि अद्ययावत करणे यासाठी खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार वेळेस डिझेल दाहिनीत मृताचे कार्य केले जाते. त्यासाठी अद्ययावत जनरेटर सोय केली जाणार आहे. त्याचप्रमाणे येथील प्रवेशद्वार, बसण्यासाठी बाकडे, लाईट, गार्डन बनवण्यासाठी नगरपरिषदेचा मानस आहे. माथेरान हद्दीतील सामाजिक सभागृह/समाज मंदिर विकसित करणे यासाठी एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

तसेच, माथेरान नगरपरिषदेचे कार्यालय खूपच जुने असून त्याठिकाणी जागा अपुरी पडते याकामी कम्युनिटी सेंटर या गावाच्या मध्यवर्ती भागात नगरपरिषदेचे कार्यालय खुले केल्यास तिथे नगराध्यक्ष केबिन तसेच अन्य लोकप्रतिनिधी, कर्मचारी यांना स्वतंत्र ऑफिस बनवण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.

आणखी ५ कोटींचा निधी मिळणार

आणखीन पाच कोटी रुपयांचा निधी लवकरच प्राप्त होणार असून यातूनच गावातील एकूण सात नैसर्गिक जलस्त्रोत पुनर्जीवित करण्यासाठी खर्च केला जाणार आहे. यामध्ये पेमास्टर विहीर व अन्य स्त्रोतांचे सुधारीकरण आणि पाण्याचा साठा करून ऐन पाणीटंचाईच्या वेळेस नागरिकांना तसेच पर्यटकांना यांचा फायदा होऊ शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -