Friday, April 19, 2024
Homeताज्या घडामोडीभांडूपमध्ये वीजचोरीची ३,६५५ प्रकरणे उघडकीस

भांडूपमध्ये वीजचोरीची ३,६५५ प्रकरणे उघडकीस

महावितरणची धडक कारवाई

भांडूप : भांडूप परिमंडलात वीजबिल वसुली सोबतच वीज जोडणी तपासणी, मीटर तपासणीमध्ये एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२१ पर्यंत वीजचोरीची १९ कोटी १० लाखांची एकूण ३,६५५ प्रकरणे उघडकीस आली आहेत.

एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२१ पर्यंत ६७,४८,१९२ युनिटची ११ कोटी ६७ लाखांची वीजचोरी उघडकीस आली आहे. यामध्ये ठाणे मंडल कार्यालया अंतर्गत ६९३ प्रकरणात ४ कोटी ०८ लाख, वाशी मंडल कार्यालयात १,५६१ प्रकरणात ६ कोटी ०४ लाख व पेण मंडल कार्यालयात ५९८ प्रकरणात १ कोटी ५४ लाखांची वीजचोरी पकडली आहे.

याशिवाय, विद्युत कायदा २००३ च्या कलम १२६ नुसार ठाणे मंडल कार्यालयात ३२० प्रकरणात ६ कोटी ०४ लाख, वाशी मंडल कार्यालयात ३७९ प्रकरणात ३ कोटी ३८ लाख, तर पेण मंडल कार्यालयात १०४ प्रकरणात ३४.४२ लाख असे एकूण ८०३ प्रकरणात ७ कोटी ४२ लाखाचा अनधिकृत विजेचा वापर आढळून आला आहे.

या मोहिमेत अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अति. कार्यकारी अभियंता, सहा. अभियंता व लाईनस्टाफ यांनी मेहनत घेतली. भांडूप परिमंडलात एकूण १९,९८७ मीटरचे एम-सिलिंग करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -