Friday, April 19, 2024
Homeदेशदेशात २४ तासात १ लाख १७ हजार १०० नवे रुग्ण, ओमायक्रॉन रुग्णांची...

देशात २४ तासात १ लाख १७ हजार १०० नवे रुग्ण, ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३ हजारांवर

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून भारतात तिसरी लाट आल्याची चर्चा आहे. देशात जवळपास सात महिन्यानंतर पुन्हा एकदा २४ तासात नव्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या वर पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात देशात १ लाख १७ हजार १०० इतके नवे रुग्ण आढळले. तर दिवसभरात ३० हजार ८३६ जण कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात ३०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढला असून तो ७.७४ टक्के इतका झाला आहे. सध्या देशात ३ लाख ७१ हजार ३६३ सक्रीय रुग्ण आहेत. लसीकरण मोहिम वेगाने सुरु असून आतापर्यंत १४९ कोटी ६६ लाख डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

भारतातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या ३ हजारांच्या वर पोहोचली आहे. राज्यातील २७ राज्यात ओमायक्रॉन पोहोचला आहे. एकूण ओमायक्रॉन बाधितांपैकी ११९९ जण बरे होऊन घरी परतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात आतापर्यंत ३ कोटी ५२ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ३ कोटी ४३ लाख जण कोरोनामुक्त झाले. तर ४ लाख ८३ हजार १७८ जणांचा मृत्यू झाला. सध्या सक्रीय रुग्णांची संख्या ३ लाख ६४ हजार ८४८ इतकी झाली आहे.

जगभरात २४ तासात २५ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनला फटका

भारतात कोरोना रुग्णांची संख्या आज एक लाखांच्या वर गेली तर जगभरात गेल्या २४ तासात कोरोनाचे २५ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेत दिवसभरात ७ लाख नवे रुग्ण आढळले असून १८०० जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर फ्रान्समध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात फ्रान्समध्ये ३ लाख ३२ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २४६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर ब्रिटनमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. गुरुवारी दिवसभरात ब्रिटनमध्ये २ लाख ४९ हजार नवे रुग्ण सापडले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -