Friday, March 29, 2024
Homeमहत्वाची बातमीमहापौरांच्या कंपनीला कोविड केंद्राचे १.९७ कोटींचे पेमेंट

महापौरांच्या कंपनीला कोविड केंद्राचे १.९७ कोटींचे पेमेंट

किरीट सोमय्या यांचा आरोप

मुंबई : मुंबई महापालिकेचे कोविड केंद्र शिवसेना नेत्यांच्या कमाईच्या साधनाचा एक पुरावा भाजपा नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी सादर केला. महापौरांच्या कंपनीला कोविड केंद्राचे १.९७ कोटी रुपयांचे पेमेंट केल्याचा आरोप त्यांनी केला.

किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडीया प्रा. लि. कंपनीला गेल्या काही महिन्यांत मुंबई महापालिकेने कोविड केंद्र व कोविडसंबंधी सुविधांचा पुरवठा करण्यासाठी २७ वेगवेगळे ऑर्डर्स व त्यासाठी १.९७ कोटींचे पेमेंट केल्याचे पुरावे डॉ. किरीट सोमय्या यांनी दिले. अशाच पद्धतीने मुंबईतील आणखीन एका कोविड केंद्रासंबंधी एका ‘बेनामी’ कंपनीला १२ कोटी रुपयांचे पेमेंट मुंबई महापालिकेने केले आहे. या संबंधीचे अधिक पेमेंट व अधिक पुरावे पुढच्या आठवड्यात देणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापौरांनी मुंबई महापालिकेचा पैसा स्वत:च्या कंपनीला देणे, ही मुंबईकरांसाठी शरमेची बाब असल्याचे सोमय्या म्हणाले.

जनता माफ करणार नाही

ठाकरे सरकारने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा सगळा दंड माफ केला असला तरी, महाराष्ट्राची जनता या घोटाळेबाज सरकारला कदापि माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी २००८-०९मध्ये ठाणे विहंग गार्डन येथील ११४ सदनिकाधारकांची फसवणूक केली, ५ मजले अनधिकृत बांधले. २०१२मध्ये प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश आले. गेल्या आठवड्यात लोकायुक्तांसमोर झालेल्या सुनावणीत ठाकरे सरकारने मान्य केले प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बांधकाम केले असून त्यांच्याकडून सगळा दंड व व्याज वसूल केले जाईल. तसेच त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि बुधवारी ठाकरे सरकारने प्रताप सरनाईक यांचा दंड माफ केला, असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -