राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा

अत्यंत प्रतिष्ठेच्या मानाल्या जाणा-या ६३व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून यामध्ये ‘बाहुबली’ चित्रपटाची सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली आहे. 

bahubaliनवी दिल्ली- अत्यंत प्रतिष्ठेच्या मानाल्या जाणा-या ६३व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून यामध्ये ‘बाहुबली’ चित्रपटाची सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली आहे. तर  सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या पुरस्कारावर महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री कंगना रानावतने नाव कोरले आहे.

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान ‘रिंगण’ला लाभला आहे. तर ‘बाजीराव मस्तानी’ ही प्रेमकहानी रुपेरी पडद्यावर साकारणारे संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

राष्ट्रीय पुरस्कार घोषित झालेली यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट – बाहुबली द बिगिनिंग
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – संजय लीला भंसाळी (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – अमिताभ बच्चन (पिकू)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना राणावत (तन्नू वेड्स मन्नू २)
सर्वोत्कृष्ट गायक – महेश काळे (कट्यार काळजात घुसली)
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – बजरंगी भाईजान
विशेष पुरस्कार – बाहुबली
स्पेशल मेन्शन – रिंकू राजगुरू (सैराट)
चित्रपट प्रेमी राज्य – गुजरात
उत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट – पायवाट
बेस्ट शॉर्ट फिल्म – अमोल देशमुख – औषध
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – रिंगण
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – दम लगा के हैशा
कोरिऑग्राफी –  रिमो डिसुझा – बाजीराव मस्तानी
बेस्ट ज्युरी – कल्की
लिरीक्स – वरुण ग्रोव्हर – मोह मोह के धागे
सुजीत सावंत – प्रॉडक्शन डिझाईन – बाजीराव मस्तानी